नारायण राणेंची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
कणकवली : सिंधुदुर्गनगरी हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या ठिकाणी रेल्वेस्थानक असून ते सिंधुदुर्ग या नावाने ओळखले जाते. प्रशासकीय केंद्र म्हणून महत्व असूनही या स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सिंधुदुर्ग स्टेशनवर पीआरएस सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच महत्वाच्या रेल्वे गाड्यांना इथे थांबा द्यावा. अशी मागणी खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले
आहे की, सिंधुदुर्ग या रेल्वे स्थानकासाठी अमृत भारत स्टेशन योजना आणि एक स्टेशन-एक उत्पादन योजनेची अंमलबजावणी करावी. स्थानकावर प्रवाशांसाठी एलईडी इंडिकेटर आणि बारमाही सावलीयुक्त प्लॅटफॉर्म उभारावा. तसेच सिंधुदुर्गातून धावणाऱ्या ११०९९/ १११०० या एलटीटी-मडगाव-एलटीटी एक्स्प्रेस, ०११३९/ ०११४० नागपूर- मडगाव नागपूर एक्स्प्रेस, १६३३६/ १६३३७ गांधीग्राम नागरकोईल एक्स्प्रेस, २२१४९/ २२१५० पुणे- एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेसना या स्थानकावर थांबा द्यावा, अशी मागणीही नारायण राणेंनी केली आहे.