19.4 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

किरण सामंत यांचे स्टेटस पुन्हा चर्चेत | त्या पोस्ट ला ‘व्हेरी टू’ कमेंट

किरण सामंत यांचे स्टेटस पुन्हा चर्चेत

रत्नागिरी : येथील शिंदेसेनेचे नेते किरण सामंत यांनी व्हॉटसअॅपला ठेवलेले स्टेटस पुन्हा चर्चेचा विषय झाला आहे. लोकसभेला उमेदवार ठरल्यानंतर त्यात मिठाचा खडा आढळला तर विधानसभेला मी कुणाला ऐकणार नाही, हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ त्यांनी स्टेटसला ठेवला आहे. त्यामुळे किरण सामंत यांची पुढील भूमिका काय आणि हा इशारा नेमका कुणाला, याचे अंदाज बांधणे सुरू झाले आहे.

याआधी किरण सामंत यांनी एकदा आपल्या व्हॉटसअॅप स्टेटसला ‘मशाल’ ठेवली होती. त्यावरुन बरीच चर्चा आणि गदारोळ झाला होता. त्यानंतर त्यांनी आपण माघार घेत असल्याचे स्टेटसला ठेवले होते.. त्यावरही बरीच चर्चा झाली. मात्र ही दोन्ही स्टेटस त्यांनी काही वेळातच डिलिट केली होती.

आता सामंत यांनी बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ स्टेटसला ठेवला आहे. ‘लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जर मला त्यात मिठाचा खडा आढळला तर विधानसभेला मी कुणाच्या बापाला ऐकणार नाही, असे विधान अजित पवार यांनी एका प्रचारसभेत केले आहे. हा व्हिडिओ सामंत यांनी स्टेटला ठेवला असून, त्यावर ‘व्हेरी टू’ अशी आपली प्रतिक्रियाही टाकली आहे.

किरण सामंत यांनी व्हॉट्सॲप स्टेटस वर ठेवलेल्या विडिओ चा स्क्रिनशॉट

त्यांच्या या स्टेटसमुळे त्यांची नेमकी भूमिका काय आहे, त्यांनी लोकसभेऐवजी आता विधानसभेवर लक्ष केंद्रीत केले आहे का, त्यांचा हा इशारा कोणाला आहे, अशा प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे. ही उत्तरे लवकरच मिळतील, अशी अपेक्षा केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!