कणकवली : उष्म्याचे प्रमाण वाढू लागताच लिंबाच्या मागणीतही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी दहा रुपयांना दोन मिळणारी लिंबे आता दहा रुपयाला एक मिळत आहे. उन्हाच्या कडाक्यात लिंबू सरबतही पिण्याची आता सोय राहिलेली नाही, असेच उद्गार सर्वसामान्य काढत आहेत.
दरवाढीचा फायदा थेट शेतकऱ्यांना कितपत होईल सांगता येत नाही. परंतु, विक्रेत्यांना याचा चांगला फायदा होत आहे. सामान्य ग्राहकांना मात्र याचा चांगलाच फायदा होत आहे.
सध्या जिल्ह्याचे तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सियस आहे. त्यामुळे उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. सध्या रमजान सुरू असल्याने लिंबाला वाढती मागणी आहे. त्याचबरोबर कडक उन्हामुळे अनेक जण लिंबू सरबत पिण्याला महत्त्व देत आहेत.