-3.8 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोची ७ वर्षीय मुलीला धडक | मुलीचा मृत्यू

दोडामार्ग : झरेबांबर तिठा, दोडामार्ग येथे रस्ता ओलांडताना भाजी वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोने धडक दिल्यामुळे कु. श्रेया संदीप गवस या मंगेली येथे राहत असलेल्या ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. भाजी वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोची धडक बसल्यामुळे या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. श्रेया संदीप गवस (रा. मांगेली) असे या चिमुकलीचे नाव आहे.

श्रेया ही काल मांगेली येथून जत्रेसाठी आपल्या आईसह मामाकडे आली होती. आरती घरी परतत असताना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही दुःखद घटना घडली. श्रेया हिला उपचारासाठी घटनास्थळावरून रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली.  संबंधित टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घ्यावे अशी मागणी जमावाकडून केली जात होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!