एक जण गंभीर जखमी ; अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले
कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर तरंदळे फाटा नजिक जानवली ओव्हरब्रिज वर दुपारी १:१५ वा. च्या. सुमारास अपघात झाला. या अपघातात फोंड्याहून कणकवलीच्या दिशेने येणारा दुचाकीस्वार संदेश एकनाथ लाड ( वय ३०, रा. फोंडाघाट) यांच्या ताब्यातील भरधाव दुचाकी क्रमांक ( एम एच ४७ एएल ६३८९ ) दगडावर घरसल्याने रस्त्यावर फेकली गेली. या अपघातात संदेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मनोज गुरव, महिला पोलीस सुप्रिया भागवत यांनी घटनास्थळी धाव घेतली. व जखमी झालेल्या संदेश लाड यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते उत्तम पुजारे यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.
यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी झालेल्या संदेश लाड यांना तपासले असता संदेश यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. यासाठी अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालय ओरोस येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.