चालकाची शोधाशोध सुरू ; दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली
कणकवली / फोंडाघाट : कोल्हापूर ते सिंधुदुर्ग असा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर बुधवारी येत असताना फोंडाघाटात पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. ही घटना सायंकाळी ६:३० वा. च्या सुमारास घडली. अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने सदरचा टँकर पलटी झाला. त्यानंतर टँकरने लगेचच पेट घेतला. यामुळे सायंकाळी ६:३० वा. पासून फोंडा घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशमन बंबला पाचारण करण्यात आले होते. बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणल्यानंतर घाटातील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
याबाबत चिंताजनक बाब म्हणजे अशी की, सदरच्या कंटेनर मध्ये असलेल्या चालकाची शोधा शोध सुरू झाली. मात्र चालक कुठे सापडून आला नाही. त्यामुळे तर्क वितर्क लढविले जात होते.