कणकवली : विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक रंगपंचमी उत्सव साजरा केला. त्यासाठी निसर्गातील विविध घटकांचा वापर करून विद्यार्थ्यांनी रंग तयार केले होते. पर्यावरण सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय हरितसेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.
पर्यावरण सेवा विभागाचे प्रमुख प्रसाद राणे यांनी बीट, हळद, पालक, भाजी, झेंडूची फुले यांच्या पासून नैसर्गिक रंग कसे तयार केले जातात याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच रासायनिक रंगाचे शरीरावर किती घातक परिमाण होतात याबाबत प्रबोधन केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनी पर्यावरण सेवा विभाग व राष्ट्रीय हरित सेना विभागाचे त्यांनी कौतूक करून निसर्ग निर्मित रंगपंचमी विषयी मार्गदर्शन केले. अच्युत वणवे यांनी भारतीय सणांचे आरोग्य विषयक महत्व विशद केले. यावेळी श्रीमती जाधव, श्रीमती शिरसाट, जे. जे. शेळके आदी उपस्थित होते