24.5 C
New York
Saturday, July 19, 2025

Buy now

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्गचा जिल्हा मेळावा २९ डिसेंबर ला कणकवलीत

संतसेवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कणकवली – सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग चा जिल्हा मेळावा दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०वाजता कणकवली येथे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान हॉल येथे होणार आहे.जिल्ह्यातील वारकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हा मेळावा साजरा करतात. जिल्ह्यातील कीर्तनकार, जेष्ठ वारकरी ही मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा कार्यकारणी च्या बैठकीत हे जाहीर करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष ह.भ.प.रामचंद्र कदम, सचिव श्री.राजू राणे, खजिनदार ह.भ.प. मधुकर प्रभुगावकर, संचालक ह.भ,प. विलास राणे, सत्यवान परब,गणपत घाडीगांवकर, प्रकाश सावंत,विनायक मेस्त्री,चंद्रकांत परब,राजेंद्र सरवणकर व वारकरी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग च्य वतीने वारकरी संप्रदायाचा मानाचा संतसेवा पुरस्कार २०२४ हा या मेळाव्यात देण्यात येणार असून जिल्यातील ६५ वर्षावरील कीर्तनकार, मृदंगमनी यांनी आपल्या संपूर्ण माहितीसह दिनांक १५ डिसेंबर २०२४ पर्यंत जिल्हा अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग, ता कणकवली जिल्हा कार्यालय येथे अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हा सचिव राजू राणे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!