8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

शिवीगाळ केल्याच्या रागातून एकाला जबर मारहाण

सावंतवाडी : शिवीगाळ केल्याच्या रागातून सावंतवाडी शहरातील एकाला तब्बल दहा ते पंधरा युवकाच्या जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. राॅयस्टन जाॅन डिसोझा असे त्याचे नाव आहे. या मारहाणीत त्याचा दात तुटल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालताच्या परिसरात घडली. या प्रकरणी जखमीची आई लितिषा जॉन डिसोजा तिने दिलेल्या तक्रारीनुसार उज्वल दापले, तुषार तुळसकर,सॅमी (पुर्ण नाव माहित नाही) रुपेश,(पुर्ण नाव माहित नाही) प्रभू (पुर्ण नाव माहित नाही) दर्शन (पुर्ण नाव माहित नाही) अशा दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील जखमी युवक रॉयस्टन डिसोजा व संशयित उज्वल दाफले यांच्यात वाद झाला होता. दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर हे प्रकरण मिटले होते. मात्र ही बाब दापले याच्या मित्रांना समजताच त्यानी डिसोजा या युवकाला हॉटेल मध्ये जाऊन रस्त्यावर बोलवून घेतले. त्यांनतर शिवीगाळ का केली? अशी विचारणा करत संशयित उज्वल दाफले व तुषार तुळसकर यांनी करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अन्य दहा ते पंधरा जणांच्या जमावानेही हाता थापटाने व रस्त्यावर खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार तेथील सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला आहे. जखमी अवस्थेत युवक रॉयस्टन याने मारहाणीची कल्पना भावाला दिली त्याने घटनास्थळी धाव घेत त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात दाखल केले. गुरुवारी जखमी युवक व त्याच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत या मारहाणीची तक्रार दिली त्यावरून गैरकायदा जमाव करुन बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य दोघांसह दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे करीत आहेत

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!