सावंतवाडी – बांदा : इन्सुली-खामदेव नाका परिसरात असलेल्या एका टायर दुकानाला आग लागली आहे. ही घटना आज रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास घडली. टायर पेटल्याने आगीने रौद्ररूप धारण केले असून दुकानात पेट्रोल असल्याचा संशय आहे. घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी केली असून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सावंतवाडी नगरपरिषदेचा अग्निशमन बंब तब्बल पाऊण तास उशिरा आल्याने ग्रामस्थानी संताप व्यक्त केला. आगीत दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले आहे. बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे, कर्मचारी प्रमोद मोरजकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. भाजपचे माजी आमदार राजन तेली, युवा नेते प्रथमेश तेली यांनीही घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आगीत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.