कणकवली : शहरातील हायवे ओव्हरब्रिजखाली असलेल्या एका भाजी विक्रेत्यासोबत एका पाटील नामक व्यक्तीची बाचाबाची झाली. यावरून कणकवली शहरातील डीपी रस्त्यावर वाटेवर चांगलेच तापले होते. भाजी विक्रेता आणि कार चा मालक हे एकमेकांना भिडले. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र पोलिसांची चाहूल लागताच जमलेल्या नागरिकांनी पोबारा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, हायवे ओव्हरब्रिज खाली एक भाजी विक्रेता आहे. त्या भाजी विक्रेत्याच्या गाडीची धडक एका पाटील नामक इसमाच्या क्रेटा कारला बसली. धडक बसल्यावर धडक देणारा वेगाने तिथून निघून गेला. त्यामुळे क्रेटा कार चे मालक श्री. पाटील यांनी त्या धडक देणाऱ्या गाडीची माहिती काढली असता, ती कार ओव्हरब्रिज खाली असलेल्या भाजी विक्रेत्याची असल्याचे सिद्ध झाले. यावेळी श्री. पाटील यांनी त्या भाजी विक्रेत्याकडे चौकशी केली असता श्री. पाटील यांच्या म्हणण्यानुसार तो भाजी विक्रेता खोटं बोलत असल्याचे दिसून आले. यावेळी भाजीविक्रेता व कार चे मालक ( श्री. पाटील ) यांच्यात बाचाबाची झाली.
त्यानंतर ओव्हरब्रिज खालील भाजीविक्रेत्ये व कार चालक श्री. पाटील यांच्या सोबत आलेली माणसं समोरासमोर आली. व त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी श्री. पाटील यांनी त्या भाजी विक्रेत्याला तुम्ही विजापूर वरून येऊन इथे आम्हाला धमक्या दाखवता, जर तो मुलगा सापडला नाही तर उद्या तुझे दुकान काढूनच टाकणार असा इशारा दिला. यावेळी वातावरण चांगलेच तणावपूर्ण झाले होते.
ही घटना गुरुवारी सायंकाळी ८ वा. च्या सुमारास घडली. साधारणपणे वीस मिनिटे हा प्रकार सुरू होता. या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनास्थळी दाखल होत आहेत याची चाहूल लागताच घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी पोबारा केला.