जनतेच्या पाठबळावर कुडाळची लढाई जिंकणार
कणकवली : राज्यातील सर्वाधिक तीन मताधिक्य मिळविणाऱ्या आमदारांमध्ये नितेश राणे असतील असा विश्वास माजी खासदार आणि कुडाळ विधानसभेचे उमेदवार निलेश राणे यांनी आज व्यक्त केला. तर जनतेचे प्रेम आणि मला दिलेली उर्जा या पाठबळावर मी कुडाळची लढाई जिंकेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कणकवली तालुक्यातील वरवडे येथील केंद्रावर निलेश राणे यांनी सायंकाळी उशिरा मतदान केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे माजी खा. निलेश राणे म्हणाले, भावासाठी मतदान करणं हा एक वेगळा आनंद असतो. जेव्हा पासून मतदानाचं वय त्यापासून मी इथेच मतदान करतोय. गेले दोन टर्म नितेश आमदार आहे. यंदा तर ते स्वत:चच रेकॉर्ड तोडणार असून राज्यात सर्वाधिक तीन मताधिक्य मिळविलेल्या आमदारांमध्ये नितेशचा समावेश असणार आहे. कुडाळ-मालवणमधील जनतेन मला चांगला प्रतिसाद दिला. प्रचंड प्रेम केलं. मोठं पाठबळ दिलं. जनतेची हीच ताकद मला निश्चितपणे निवडून देणार असून २३ तारीखला ते स्पष्ट होईल. या निवडणुकीत आम्ही विकासाचा मुद्दा पुढे नेला. विरोधकांच्या कुठल्याही आरोपांना उत्तरं दिली नाहीत. तसेच विरोधकांवर टीकाही केली नाही. हाच मुद्दा कुडाळ मालवणमधील मतदारांना भावला आहे.
गेली दहा वर्षे विरोधक आमच्यावर आरोप करत आहेत ते आरोप यंदाच्याही निवडणुकीत झाले. त्यामुळे विरोधकांनी आमची लढाई सोपी केली असल्याचे माजी खा. निलेशराणे म्हणाले