8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

सिंधुकन्या अक्सा शिरगावकरची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत सांघिक रौप्य पदकाला गवसणी

आंतरशालेय धनुर्विद्या राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले सांघिक सिल्व्हर मेडल

कणकवली : सिंधुकन्या अक्सा मुद्रसरनझर शिरगावकर हिने गुजरात येथे १४ वर्षांखालील वयोगटात घेण्यात आलेल्या आंतरशालेय ६८ व्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत ५० मीटर कंपाउंड आर्चरी प्रकारात सांघिक सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. १४ वर्षांखालील वयोगटातील राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा १८ ते १८ नोव्हेंबर दरम्यान गुजरात राज्यातील नडियाड येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये संपन्न झाली. १४ वर्षे वयोगटातील राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत देशातील विविध राज्यातील एकूण ७२ स्पर्धक सहभागी झाले होते. अक्सा हिने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत आपल्या सहकारी तीन स्पर्धकांसह सिल्व्हर पदकाची कमाई केली. अक्सा ही कणकवली येथील पोदार हायस्कुल ची विद्यार्थिनी असून कणकवली तालुक्यातील कलमठ येथील शासकीय ठेकेदार मुद्रसरनझर तैय्यब शिरगावकर आणि न्यू खुशबू स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या संस्थापिका तन्वीर शिरगावकर यांची सुकन्या आहे. सातारा येथील दृष्टी आर्चरी अकॅडमी चे संस्थापक प्रशिक्षक प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अक्सा हिने हे सुयश प्राप्त केले आहे. राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत सांघिक रौप्य पदक प्राप्त केलेल्याबद्दल अक्सा हिचे सिंधुदुर्गात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!