कणकवली मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार नवाज खाणी यांचा संदेश पारकर, नितेश राणे यांना टोला
प्रचार करताना लोकांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
कणकवली : बऱ्याच लोकांना नवाज खाणी उमेदवारी अर्ज मागे घेणार अशी स्वप्न पडत होती. मुस्लिम समाजाचे काही उबाठा सेनेचे पदाधिकारी हे सांगत होते की उमेदवारी अर्ज मागे घेऊन पाठिंबा द्यावा असे सल्ले देत होते. मात्र ते एक पक्षाच्या पदावर आहेत, पक्षाचे काम करत आहेत. परंतु मी अपक्ष लढत आहे. ते म्हणत होते की नवाज खाणी याना ओळखत नाही. मात्र त्यांच्या आरोपाना तंतोतंत प्रत्युत्तर देत नवाज खाणी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. श्री. खाणी म्हणाले की त्यांनी मला समाज बांधव म्हणून पाठींबा दिला पाहिजे होता. संदेश पारकर यांनीच कालची पत्रकार परिषद घ्यायला लावली होती, असा आरोपही श्री. खाणी यांनी केला.
तिरंग्यांचे ऐक्य राखून लढत आहे. जे जे माझ्यावर आरोप करत आहेत. की, नितेश राणे यांनी मला उभं केलं आहे त्याचा खुलासा केलेला आहे. नितेश राणेंनी संदेश पारकर ला उभं केलेलं आहे, असा आरोपही वारंवार करत आहेत. येणाऱ्या १० तारीख ला सगळ्यांची झोप उडून जाणार आहे. सर्वधर्म समभावाच्या लोकांचे मला फोन येत आहेत, लोक उत्स्फूर्त पणे मला पाठिंबा देत आहेत. देशाचं नाव जगात अग्रेसर राहण्यासाठी अशीच ताकद लावली पाहिजे.
प्रचारासाठी मागील काही दिवस फिरत आहे. कणकवली, वैभववाडी च्या काही भागातून मला फोन येत आहेत की, लोक अक्षरशः बोलावून घेत आहेत. निवडणूक अर्ज भरल्यानंतर आपल्याला तरुण पिढीच्या मनातील अत्यंत आवडीची निशाणी मिळाली आहे. त्यामुळे समोरील उमेदवारांनी जोरदार बॉलिंग करावी मी सहा बॉलात सहा षटकार मारण्यासाठी सज्ज आहे, असा टोलाही श्री. खाणी यांनी लगावला.
यावेळी सादिक धोपावूकर, फैज खान, रमजान खाण, जाईद शेख, आदिल खतीब, आफान शेख, परवेज कादरी, इमरान शेख, साइल चौगुले, रोहित पठाडे, बाबूल खाडगी उपस्थित होते.