15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

कणकवली बांधकरवाडी येथील मुलांनी साकारली किल्ले लोहगडची प्रतिकृती

किल्ले उभे करण्यासाठी लागले चक्क आठ दिवस ; दिवाळी सणात ते किल्ले ठरतायत लक्षवेधी

कणकवली : दिवाळी सणा दरम्यान किल्ले बांधण्याची एक जुनी प्रथा आहे. यातून संस्कृतीचे रक्षण होऊन नवीन पिढीमध्ये शिव संस्कार रुजवण्यासाठी दिवाळी सणात किल्ल्याची प्रतिकृती साकारली जाते. कणकवली तालुक्यातील बांधकरवाडी येथील मृगेश राणे, अथर्व एकावडे, शिवदत धबाले, या मुलांनी मिळून किल्ले लोहगड ची प्रतिकृती साकारली आहे. यासाठी त्यांना माती, दगड, शाडू माती, लाकडी भुसा, इत्यादीचा वापर करावा लागला. किल्ला उभा करण्यासाठी त्यांना तब्बल आठ दिवस मेहनत घ्यावी लागली. तब्बल आठ दिवसानंतर सुंदर असे दोन किल्ले उभारले होते. यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, घोडे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, बाजूला तटबंदी, काही वन्यप्राणी, शिवकाळात असलेली छोटेखानी घरे, मंदिरे दाखवण्याचा प्रयत्न या प्रतिकृती मधून करण्यात आला आहे. दिवाळी सणात हे किल्ले आकर्षण ठरत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!