8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

कलमठ बिडियेवाडी येथील युवकांचा भाजप मध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांना दिला पाठिंबा

कणकवली : कलमठ गावातील तरुणांनी आमदार नितेश राणेंना विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देत भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, महेश लाड, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, विजय चिंदरकर, पपू यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. कलमठ बिडीयेवाडी येथील प्रवेशकर्त्यामध्ये तेजस लाड, भूषण पवार,मयूर लाड, शुभम देसाई,ओंकार मेस्त्री,साहिल देसाई, यश वाळके, नितेश मेस्त्री, प्रवीण देसाई, अनिल साळसकर, आदेश नाडकर्णी, मयूर गावडे, प्रतीक देसाई आदी तरुणांनी नितेश राणेंना पाठिंबा देत भाजप मध्ये प्रवेश केला

प्रवेश केला, आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन आपण प्रवेश करत असून नितेश राणेंच्या विजयात आम्ही वाटा उचलू असे यावेळी प्रवेशकर्ते म्हणाले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांनी स्वागत करताना आपण घेतलेला निर्णय किती योग्य आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल आपण टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू असे सांगितले.

यावेळी संतोष रेवंडकर, परेश कांबळी, ऋत्विज राणे, प्रवीण सावंत,बाबू नारकर, आबा कोरगावकर, कान्हा मलांडकर, समीर रजपूत,अमोल लाड, विकास मेस्त्री,ज्ञानेश्वर यादव,प्रतीक माईणकर, समर्थ कोरगावकर, स्वरूप कोरगावकर, समीर कवठणकर रुपेश गायचोर, कौस्तुभ पुजारे, कौस्तुभ मेस्त्री, आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!