-11.2 C
New York
Saturday, February 7, 2026

Buy now

चक्रीवादळग्रस्त भागाला संदेश पारकर यांची भेट

तात्काळ पंचनामे करत भरपाई देण्याच्या प्रशासनाला सूचना

कणकवली : कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द येथे चक्रीवादळाने मोठे नुकसान झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी या नुकसानग्रस्त भागाला भेट देत पाहणी केली. तेथील महापुरुष मंदिराला देखील भेट देत तिथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.तसेच तलाठी किशोर चौगुले यांना तातडीने पंचनामे करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवा अशा सूचना दिल्या. तसेच वरिष्ठांशी संपर्क साधत नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवा. जनतेचे मोठे नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्त यांच्या पाठीशी महाविकास आघाडी ठाम उभी राहील अशी ग्वाही देखील संदेश पारकर यांनी दिली. यावेळी त्यांच्याबरोबर सरपंच अविनाश गिरकर यांच्यासह रामकृष्ण चाळके आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!