कणकवली : बोर्डवे गावात महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी घरोघरी जाऊन भेट घेत, ग्रामीण भागातील ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत चर्चा कली.
यावेळी बोर्डवे गावातील मोराई देवी, श्री.कालिका देवी मंदीरात जावूया दर्शन घेतले. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने संदेश पारकर आमदार व्हावे भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त करण्यात आली.
यावेळी उ.बा.ठा.शिवसेना पक्षाचे उपविभाग प्रमुख शरद साळवी,जेष्ठ कार्यकर्ते संतोष येंडे,बोर्डवे ग्रामपंचायत सदस्य महादेव राठवड, युवासेना शाखाप्रमुख स्वप्निल शिंदे, नरेश येंडे,सुंदर साळवी, विनोद परब, अशपाक शेख, कुतुब शेख, मोहसिन शेख, आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.