स्वतःच्या स्वार्थासाठी खासदारकी मिळवलीय ; संदेश पारकर
कणकवली : प्रमोद जठरांची राजकीय फसवणूक झालेली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे यांना प्रवेश देऊन प्रमोद जठरांचं वर्चस्व बाजूला सारल गेल, आणि नितेश राणे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. प्रमोद जठार सर्व बैठकांमध्ये, सभांमध्ये, पत्रकार परिषदांमध्ये सांगत होते की, लोकसभेची निवडणूक आपण लढणार आणि त्यासाठी आपल्याला नारायण राणे यांचा पाठिंबा आहे. परंतु राणेंना जेव्हा स्वतःचा स्वार्थ दिसला की, जर प्रमोद जठार खासदार झाले तर राणेंची या जिल्ह्यावरील जी मक्तेदारी आहे ती कुठेतरी संपुष्टात येईल. राणेंची घराणेशाही संपून प्रमोद जठार यांच्यासारखा सर्व सामान्य कार्यकर्ता खासदार होईल. या भीतीने राणेंनी त्यांना विरोध केला आणि स्वतःच्या स्वार्थासाठी खासदारकी मिळवली. हे वास्तव आहे, असा हल्लाबोल देखील श्री पारकर यांनी केला.