8.9 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

कोणी कितीही प्रयत्न केला तरी येणाऱ्या २३ नोव्हेंबरला नितेश राणेंचा पराभव निश्चित

संदेश पारकर यांनी व्यक्त केला विश्वास

कणकवली : राजकारणमध्ये आम्ही उतरलेले आहोत. परिणामांची चिंता आम्ही कधीच करत नाही. जे काय असेल त्या लढाईत आम्ही लढण्यासाठी नेहमी सज्ज असतो. त्यामुळे आमदार नितेश राणे यांना त्यांचा पराभव त्यांच्या नजरेसमोर दिसत आहे. पराभवाची भीती त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून त्यानी माझ्यासमोर माझ्या मतांमध्ये विभागणी व्हावी, यासाठी संदेश परकर नावाचा अपक्ष उमेदवार त्यांनी आपल्या माध्यमातून उभा केला आहे. तसेच मुस्लिम समाजाची मते त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळे त्याही मतांची विभागणी व्हावी यासाठी मुस्लिम समाजाचा एक उमेदवार त्यांनी उभा केला आहे. परंतु येणाऱ्या २३ नोव्हेंबरला आमदार नितेश राणे यांचा पराभव निश्चित आहे, आणि त्यामुळे हे सारे प्रयत्न ते करत आहेत. मात्र मुस्लिम समाजाचा मतदार हा सुज्ञ मतदार आहे. इथला मतदार राजा देखील सुज्ञ मतदार आहे. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले, तरी येणाऱ्या २३ नोव्हेंबरला आमदार नितेश राणे यांचा पराभव निश्चित आहे. असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर यांनी व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!