शिवसेना शाखा कनेडी येथे तालुकाप्रमुख प्रथमेश मोहनराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली केला जाहीर प्रवेश
कणकवली : भाजपच्या नरडवे येथील भ्रष्टाचाराला कंटाळून भाजपामधील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. भाजपा मध्ये ठेकेदारी एकाच व्यक्तीला दिली जाते. आणि बोगस कामे करून भ्रष्टाचार केला जातो. युवा तरुण बेरोजगार असून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष दिला जात नाही. या सर्व परिस्थितीला कंटाळून येणाऱ्या विधानसभेला सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी उमेदवार संदेश पारकर यांचे निष्ठेने काम करून त्यांना विजयी करणार अशी ग्वाही या तरुणांनी दिली.
यावेळी सुरज अरविंद सावंत, प्रफुल गणपत मर्गज, मंदार मधुकर शिंदे, तुषार राजचंद्र बाईत, सतीश सत्यवान मर्गज यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला.
यावेळी तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, बेनी डिसोजा, मुकेश सावंत, सतीश परब, संतोष सावंत, गणेश शिवडावकर, तुषार गावकर, संतोष दळवी, अर्जुन कांबळे, संतोष कांबळे, सुदर्शन रासम आदी उपस्थित होते