8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

कणकवली मतदारसंघातील आठही उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध

निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांची माहिती

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात ८ उमेदवारानी दाखल केलेले ९ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत. त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघात आता ८ उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी छाननी प्रक्रिया पार पाडली .यावेळी उमेदवार आ. नितेश राणे, संदेश पारकर, गणेश माने, प्रकाश नारकर आदी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कणकवली विधानसभा मतदारसंघात निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पार्टीचे नितेश नारायण राणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदेश भास्कर पारकर, अपक्ष संदेश सुदाम परकर, बंदेनवाज हुसेन खानी, प्रकाश नारकर, विश्वनाथ कदम व बहुजन समाज पार्टीचे चंद्रकांत जाधव, अपक्ष गणेश माने यांचे अर्ज वैध ठरले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, देवगड तहसीलदार लक्ष्मण कसेकर, वैभववाडी सूर्यकांत पाटील उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!