26.1 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

विशाल परब यांना पक्षातून काढून टाका ; खा. नारायण राणेंच्या सूचना

सावंतवाडी : अजून ही वेळ गेलेली नाही, विशाल परब यांनी महायुतीचा धर्म पाळून आपला अर्ज मागे घ्यावा. कुठल्याही परिस्थितीत पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांचे नाव वापरण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. अन्यथा पक्षाकडुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया महायुतीचे सावंतवाडी मतदारसंघाचे उमेदवार दीपक केसरकर यांनी दिली.

तोच धागा पकडुन खा. नारायण राणे यांनी कोण विशाल परब? असा सवाल करीत याचा पक्षाशी कोणताही संबंध नाही असे सांगून त्यांना पक्षातून काढून टाका, अशा सुचना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना केल्या.

केसरकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राणेंनी ही परखड शब्दात विशाल परब यांच्यावर ताशेरे ओढत त्यांना पक्षातून काढून टाकण्याच्या सुचना केल्या तर केसरकर यांनी परब हे चुकीच्या पध्दतीने पक्षाचे तसेच नेत्यांचे नाव वापरत आहेत अशा प्रकारे नाव वापरण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही, असे सांगत ते भाजपा कार्यकर्त्यांना चुकीची माहिती देत असतील तर ते योग्य नाही. त्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्षांनी याबाबत योग्य ती भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!