28.9 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

दिविजा वृध्दाश्रमातील आजी- आजोबांचे आशीर्वाद प्रेरणादायी – आशिये सरपंच महेश गुरव

कणकवली | मयुर ठाकूर : दिविजा वृध्दाश्रमातील सर्व वडीलधारी मंडळी, असलदे ग्रामस्थ आणि माझ्या मित्र परिवारासमोर नतमस्तक होतो. या वृध्दाश्रमात गेल्या वर्षापासून जीवनावश्यक वस्तूंची भेट देवून खारीचा वाटा उचलण्याच काम महेश गुरव मित्रमंडळाचे सहकारी करीत आहेत. नेहमी वाढदिवस साजरा करण्याच्या पध्दतीला दुर्लक्ष करण्याच काम मी करत आलो. तरी देखील माझ्या मित्रांनी आग्रहाने हा कार्यक्रम आयोजित केला. आपल्यामध्ये राहून आशीर्वाद घेवून वाढदिवस साजरा झाला, हे माझ्या पुढील जीवनात प्रेरणादायी असेल, असे प्रतिपादन आशिये सरपंच महेश गुरव यांनी केले.

असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात महेश गुरव मित्रमंडळाच्यावतीने महेश गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंची भेट देण्यात आली. तसेच केक कापून त्यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते, यावेळी भजन कलाकार समिती अध्यक्ष संतोष कानडे, भाजपा उपाध्यक्ष सोनू सावंत, माजी सभापती दिलीप तळेकर, सरपंच चंद्रकांत डामरे, सोसायटी चेअरमन भगवान लोके, कलमठ माजी सरपंच महेश लाड, माजी सरपंच पंढरी वायगणकर, असलदे सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे, परशुराम परब, मनोज लोके, सचिन हरमलकर, आशिये माजी सरपंच शंकर गुरव, पांडुरंग बाणे, बाळा बाणे, उपसरपंच संदीप जाधव, माजी उपसरपंच प्रवीण ठाकूर, रविंद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य सुहास गुरव, पिसेकामते सरपंच सुहास राणे, सत्यवान गुरव, पंढरीनाथ गुरव व असलदे व आशिये गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आशिये सरपंच महेश गुरव यांचा वाढदिवसानिमित्त असलदे गावच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सरपंच चंद्रकांत डामरे, सोसायटी चेअरमन भगवान लोके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच दिविजा वृध्दाश्रमाच्या वतीने महेश गुरव यांना वृक्षभेट देवून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.

महेश गुरव म्हणाले, असलदे गावचे सरपंच चंद्रकांत डामरे आणि त्यांच्या सहका-यांनी माझा सत्काररुपी केलेला मानसन्मान प्रेरणादायी आहे. यापुढील काळात सामाजिक बांधिलकी जोपासत अविरतपणे जनतेची सेवा करत राहणार आहे. भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे म्हणाले, महेश गुरव हे सर्वसामान्य लोकांचे नेतृत्व करतात. लोकांसाठी वेळ देवून काम करण्याची भुमिका त्यांची असते. त्यांच्या पुढील जीवनासाठी आमच्या शुभेच्छा आहेत.

भाजपा उपाध्यक्ष सोनु सावंत म्हणाले, दिवीजा वृध्दाश्रमात महेश गुरव यांचा होत असलेला दरवर्षी कार्यक्रम आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. नेहमी आमच्या सोबत चांगल्या कामांसाठी पुढाकार महेश गुरव घेत असतात. माजी उपसभापती दिलीप तळेकर म्हणाले, दिवीजा वृध्दाश्रम हा सर्वसामान्य आजी आजोबांचे मायेचे घर आहे. त्यामुळे या वृध्दाश्रमाला सातत्याने मदत करण्याचा प्रयत्न आमचा असतो. महेश गुरव यांनी जीवनावश्यक वस्तु देवून त्यांच्या सामाजिक कामाला हातभार लावला.

सरपंच चंद्रकांत डामरे म्हणाले, सरपंच महेश गुरव हे सामाजिक काम नेहमी करतात. ते आमच्या गावात येवून वृध्दाश्रमात वाढदिवस साजरा करतात. हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके म्हणाले, महेश गुरव मित्रपरिवाराच्या वतीने वृध्दाश्रमाला मदत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आमच्या गावात आलेल्या अशा व्यक्तीमत्वाचा सन्मान करणं हे आमच भाग्य समजतो. हा कार्यक्रम केवळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केला जात आहे. महेश गुरव हे रात्री अपरात्री देखील लोकांसाठी धावून जाण्याची भुमिका सर्वांसाठी आदर्शवत आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार ऋषिकेश मोरजकर यांनी केले तर आभार वृध्दाश्रमाचे संदेश शेट्ये यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!