8.4 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

महायुतीच्या यशात भाजप युवा मोर्चाचा सिंहाचा वाटा असेल असे काम करा

 “आयडीयाज फॉर विकसित महाराष्ट्र” कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचे आवाहन

कणकवली येथे युवा मोर्चाचा प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला कार्यक्रम

कणकवली | मयुर ठाकूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रत्येक उमेदवार प्रचंड मतानी निवडून आला पाहिजे. यासाठी युवा मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करा आणि या निवडणुकी मधील यशात सिंहाचा वाटा उचला असे आवाहन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी केले.
कणकवली येथील प्रहार भवन च्या सभागृहात “आयडीयाज फॉर विकसित महाराष्ट्र” या भाजपा युवा मोर्चाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष लखमराजे भोसले,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, सिंधुदुर्ग प्रभारी स्वप्निल काळे – पाटील, सहप्रभारी अक्षय पाठक, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष पुजारे, विजय इंगळे, प्रज्वल वर्दम, आदि उपस्थित होते.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्ष भक्कम होतो. युवा मोर्चाचं काम करून अनेकांनी देशाच आणि राज्याच नेतृत्व केल आहे. युवा मोर्चाचं काम करताना सर्वांनी मन लावून काम केलं पाहिजे. युवा मोर्चाकडून अनेक शिलेदार तयार झाले पाहिजेत. कडवट हिंदुत्ववादाचा विचार आपण घेऊन पुढे जात आहोत. कार्यकर्त्यांमध्ये पाच प्रकार असतात त्रस्त, अस्वस्थ, स्वस्थ, व्यस्त, मस्त त्यापैकी आपण व्यस्त आणि मस्त म्हणजे जे जबाबदारी आणि आनंदाने काम करतात त्यांना घेऊन पुढे चाललं पाहिजे. वरिष्ठांना अपेक्षित निकाल देऊन लोकसभेप्रमाणे यावेळी आपण काम करूया. अनुप मोरे यांच्यासारख्या कार्यकर्ता ३२ जिल्हे आणि आठ हजार किलोमीटरचा प्रवास करणारा पहिलाच पाहिला आहे. त्यामुळे सर्वांनी योग्य ती जबाबदारी घेऊन पार पाडली पाहिजे.
लखमराजे भोसले म्हणाले, युवा मोर्चा संघटनात्मक कुटुंब आहे. पार्टी आपल्या राष्ट्राचे हित पाहते. राष्ट्र प्रथम हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे सर्वांनी जोमाने काम करूया आणि पार्टीचे असेच नाव उज्वल करूया, असे मत लखन राजे भोसले यांनी व्यक्त केले.

निखिल चव्हाण म्हणाले, बैठकीला आज मेळावा चे स्वरूप आले आहे. येणारं सरकार हे महायुतीचे असणार आहे. युवा मोर्चाच्या माध्यमातून आपण जिल्ह्यात ठिकठिकाणी फिरलं पाहिजे. युवकांचे नेतृत्व करण्याची ताकद युवा मोर्चामध्ये आहे. महाराष्ट्राचा आवाज आपल्या जिल्ह्यात आहे. सकाळी १० वाजता जो भोंगा वाजतओ त्याचा आणि त्याच्या मालकाचा आवाज बंद करण्याची ताकद आमदार नितेश राणे यांच्यात आहे. त्यामुळे आपण सर्वांनी युवा मोर्चाच्या माध्यमातून कामाला लागू या आणि युवा मोर्चा ची ताकद दाखवू या असे मार्गदर्शन केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!