23.1 C
New York
Wednesday, July 2, 2025

Buy now

लौकिक भोगले याला लोक वाद्य वादन स्पर्धेमध्ये पुणा येथे कांस्यपदक..

लौकिक भोगले मसुरे गावचा सुपुत्र..

मसुरे प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कडून अयोजित केलेल्या जल्लोष या स्पर्धेत लोकवाद्यसाठी मसुरे गडघेरावाडी येथील सुपुत्र

लौकिक भगवान भोगले याला कांस्यपदक मिळाले आहे त्याची पुणे विद्यापिठाच्या लोकवाद्य ग्रुप मध्ये निवड झाली आहे.त्याने पखावज, ढोलकी, संबळ, हलगी, दिमडी, धनगर ढोल इत्यादी 10 हून अधिक तालवाद्ये वाजवली होती.

लौकिक भोगले हा पुणे विद्यापीठात पुढे होणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय लोक वाद्यवृंदासाठी कला सादर करणार आहे. लौकिक भोगले याचे पखवाज वादनाचे शिक्षण प्रसिद्ध पखवाज विशारद मसुरे गावचे सुपुत्र गुरुवर्य श्री सचिन कातवणकर सर यांच्या कडे चालू आहे.आजवरच्या लौकिक भोगले याच्या यशात त्याचे गुरु सचिन कातवणकर आणि आई वडिलांचा मोठा वाटा आहे. लौकिक भोगले सध्या विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनीरिंग चे शिक्षण घेत आहे.

त्याचे प्राथमिक शिक्षण मसुरे केंद्र शाळा यानंतर आर पी बागवे हायस्कूल मसुरे आणि ज्युनियर कॉलेज कुडाळ असे यापूर्वीचे शिक्षण झाले आहे. लौकिक याच्या यशाबद्दल उद्योजक श्री दीपक परब, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, माजी जी प अध्यक्ष सरोज परब, महेश बागवे, विलास मेस्त्री, मसुरे केंद्र शाळा मुख्याध्यापिका सौ शर्वरी सावंत मॅडम, श्रीकांत सावंत यांनी अभिनंदन केले असून त्याचे मसुरे गावातून कौतुक होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!