-0.2 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

कणकवलीतील दिवाळी बाजाराचे रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. जगदीश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

कणकवली | मयुर ठाकूर : दरवर्षी कणकवली येथील ओव्हरब्रिज खाली दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील दिवाळी बाजाराचे रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. जगदीश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

 

यावेळी रोटरी क्लब अध्यक्ष प्रा. जगदीश राणे, ॲड. दीपक अंधारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे दादा कुडतरकर, रवी परब, महेंद्र मुरकर, राजश्री रावराणे, दीपक बेलवलकर, संतोष कांबळे, अनिल कर्पे, उमा परब, तृप्ती कांबळे, लवू पिळणकर, यांच्यासह बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

यावेळी दिवाळी बाजारात मातीची भांडी, आकाश कंदील, दिवाळीचा फराळ, पणत्या, तोरणे, कपडे, अगरबत्ती, उटणे यासह दिवाळी सणासाठी लागणारे साहित्य या दिवाळी बाजारात एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!