7.2 C
New York
Monday, November 4, 2024

Buy now

उद्धव ठाकरे आणि भाजप नेते भेटीच्या आरोपावर उबाठा ची चिडचिड कशासाठी ?

म्हणजेच दाल मे कुछ काला है

आमदार नितेश राणे यांचा संजय राऊत यांना टोला

कणकवली : उद्धव ठाकरे आणि भाजप नेते अमित भाई शहा यांची भेट झाली अशी माध्यमांपर्यंत पोचलेली बातमी काँग्रेस पक्षाच्या सोर्स मधून गेलेली आहे. त्याच काँग्रेस वाल्यांसोबत संजय राजाराम राऊत मांडीला मांडी लावून बसतो आणि त्याच नेत्यांचे बाप काढतो. जर तुम्ही भाजपच्या नेत्यांना भेटला नसाल आणि तुमच्या मनात काहीच काळेभेरे नसेल तर एवढी तडफड कशाला ? चोर के दाढी मे टिनका नसेल तर तुम्हाला राग येण्याचे कारण नाही. ज्या अर्थी तुमची चिडचिड होते आहे. तडफड होते आहे.याचा अर्थच दाल मे कुछ तो काला है..! या पुरी दाल ही काली है..! असा टोला भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी लगावला.तर कणकवली प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलत होते.

आमदार नितेश राणे म्हणले,जे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे होऊ शकले नाहीत ते काँग्रेसचे कधीच होऊ शकणार नाहीत.त्यामुळे काँग्रेसने सुद्धा या गोष्टीचा विचार करावा आणि संजय राजाराम राऊत सारख्या बिन भरोशाच्या माणसावर किती विश्वास ठेवावा हे ठरवावे.असा सल्ला यावेळी दिला.

आतां पर्यंत राऊत चे कुठले आरोप खरे ठरलेत. याबाबत माध्यमांनी त्याला विचारले पाहिजे. कोणाची रोकडं सापडली कि संजय राऊत ती रोकडं महायुतीची आहे असे ओरडतो.लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची पण बॅग चेक केली होतीच ना काय मिळालं ? त्यामुळे संजय राऊत च्या आरोपांना मनोरंजन म्हणून महाराष्ट्र पहात आहे. एकता कपूर ने त्याला सीरिअल मध्ये घ्याव.कारण त्याचे डायलॉग कोणीच गांभीर्याने घेत नाही.काँग्रेस च्या उमेदवारांची यादीने मातोश्रीची निव हलेल,झोप उडेल आणि त्यामुळे संध्याकाळचा वाईन चा ग्लास वाढेल एवढं नक्की. अशी टीका यावेळी श्री नितेश राणे यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!