कनेडी : राज्यस्तरीय महानगरपालिका क्षेत्राचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हरकुळ खुर्द गावडेवाडीशाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक सुनील लक्ष्मण ठाकूर यांना प्रदान करण्यात आला आहे.
सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षाचा पुरस्कार वितरण सोहळा कराडमध्ये माजी मंत्री चंद्रकांत दादा पाटील,अतुल भोसले कृष्णा सहकारी साखर कारखाना व मेडिकल कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
तण मन धन अर्पून ज्ञानार्जन करणाऱ्या शिक्षकांमध्ये सुनिल ठाकूर यांची गणना केली जाते. गेली ३२ वर्षे ते शिक्षण क्षेतात उत्कृष्ठ कामगीरी करत आहेत. त्यांनी अवघड क्षेतात काम करत असताना अनेक समस्यांना तोंड देत विद्यार्थी घडविले आहेत जे आज मोठ मोठ्या हुद्यांवर काम करत आहेत. त्यांनी शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवित असताना माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तालुका स्तरावर सतत दोन वर्षे द्वितीय व प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
क्रीडा क्षेत्रात तसेच ज्ञानी मी होणार जिल्हास्तरिय स्पर्धेत प्रथम क्रमांक, एसटीएस परीक्षा जिल्हा प्रथम क्रमांक, डाॅ. ए.पी.जे कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथम क्रमांक, गुजरात अभ्यास दौरा , इस्रो अभ्यास दौरा सतत दोन वर्षे त्यांच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. स्कॉलरशिप परीक्षे मध्ये २ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले आहेत. तसेच नवोदय विद्यालया मध्ये एका विद्यार्थ्याची निवड झाली आहे.त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांचे प्रसंगी पालकत्व हि स्वीकारले आहे.
या पुर्वी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार, महाकवी वामनदादा कर्डक आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साई संस्थान शिर्डी आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त करत एबीपी माझा कडून उत्कृष्ट शालेय कामाबद्दल सन्मान पत्र मिळविले आहे.त्यांच्या या यशा बद्दल दारीस्ते व हरकूळ गावच्या ग्रामस्थ, पालक व माजी विदयाथ्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छ दिल्या आहेत.
फोटो ओळी: राज्यस्तरीय महानगरपालिका क्षेत्राचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हरकुळ खुर्द गावडेवाडी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक सुनील ठाकूर यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला आहे.