जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे नाव चर्चेत ; कार्यकर्त्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : कणकवली विधानसभेत भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात लढण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार कोण असणार याची उत्सुकता लागली होती. अखेर विश्वसनीय सूत्रांकडून उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकरच उमेदवार असणार असा दावा केला जात असून कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्सुकता शिगेला पोचलेली पाहायला मिळत आहे. केवळ अधिकृत घोषणा होण फक्त बाकी असून लवकरच उमेदवाराचे नाव घोषित होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षानंतर आता पुन्हा कणकवलीत राणे विरुद्ध पारकर असा सामना रंगलेला पाहायला मिळणार आहे. उमेदवारीबाबत रविवारी मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय झाला असल्याचेही अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यामुळे कोण कोणाला जोरदार टक्कर ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे.