15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु असताना देखील आमदार वैभव नाईक यांनी आपले दायित्व निभावले

भात शेती नुकसानीची केली पाहणी; जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मुसळधार स्वरूपात पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भात शेती कापण्या योग्य झाली असून पावसामुळे शेतकऱ्यांना भात कापणी करता येत नाही. उभी असलेली भात शेती जमीनदोस्त झाली आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु असून सत्ताधारी नेते मतांची गोळाबेरीज करीत आहेत. मात्र आपले आमदार वैभव नाईक यांनी स्वतःचे दायित्व निभावत विविध ठिकाणी भेट देऊन भात शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!