0.6 C
New York
Thursday, March 19, 2026

Buy now

झोळंबे येथील युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू

दोडामार्ग : तालुक्यातील झोळंबे येथील युवकाचा श्री योगेश्वरी मंदिराच्या सभा मंडप परिसरात विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. वैभव गुरुदास भिडे (वय २५) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. कुळण येथे पौर्णिमेनिमित्त योगेश्वरी मंदिरात देवीचा पालखी उत्सव सुरू होता, अशी माहिती देण्यात आली. या ठिकाणी वैभव हा काहीतरी दुरुस्ती काम करत असताना त्याचा विद्युत वाहिनीला स्पर्श झाला आणि तो जमिनीवर कोसळला. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने त्याला डिचोली आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी वैभव याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!