गोळवण गावचा विकास आमदार वैभव नाईकच करू शकतात; ग्रामस्थांना विश्वास.
मालवण : तालुक्यातील गोळवण वरची गावडेवाडी येथील ग्रामस्थांना आमदार वैभव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून सुमारे ५ लाख रु. खर्चाचे सामाजिक, सांस्कृतिक सभागृह बांधून देण्यात आले आहे.या सभागृहाचा उद्घाटन सोहळा काल आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य मेघा गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.आमदार वैभव नाईक यांच्या कामाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला व गोळवण गावचा विकास फक्त आमदार वैभव नाईकच करू शकतात असा विश्वास व्यक्त करत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठ मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा समजून घेतल्या.सभागृहासाठी विशेष मेहणत घेणाऱ्या उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण व दिवंगत शाखाप्रमुख सुभाष सामंत यांचेही ग्रामस्थांनी आभार मानले.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की नारायण राणे हे ५ वर्ष केंद्रीय मंत्री,राज्यसभा खासदार, तसेच या जिल्ह्याचे विद्यमान खासदार आहेत तसेच निलेश राणे देखील ५ वर्ष खासदार होते त्यांनी आपल्या कार्यकाळात कोणतीच विकास कामे केली नाहीत याउलट मी केवळ आमदार असुन लाखो रुपयांचा निधी गोळवण गावच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला आहे तसेच राणे हे जनतेला कधीच सहज उपलब्ध होत नाहीत हे तुम्हा जनतेलाही माहीत आहे मात्र मला भेटण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज लागत नाही हे सर्वश्रुत आहे तसेच गोळवण
वासियांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असुन आपण सर्वांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवावा असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी गोळवण वासियांना केले आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, पराग नार्वेकर,विभागप्रमुख विजय पालव,उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण,रुपेश वर्दम,मंडाळाचे अध्यक्ष सुनील गावडे,आनंद चिरमुले,अमित भोगले,माजी सरपंच प्रज्ञा चव्हाण,उपसरपंच दादा गावडे, राजू नाडकर्णी,दिगंबर सावंत,मेघा गावडे, मुरारी गावडे,आदीओम लाड,प्रभाकर गावडे,रामु ओवळेकर,विलास गावडे,सुशील गावडे, दिपक गावडे,बाळा गावडे,दिनेश गावडे, पप्पू सावंत,सुरेश गावडे,समीर लाड,गुरुनाथ पालव,गणेश मुणगेकर
बंड्या वाडकर,अक्षय दाभोळकर, भाई फनसातले आदी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.