15.3 C
New York
Saturday, March 22, 2025

Buy now

आमदार वैभव नाईक यांनी गोळवण गावठणवाडी येथील श्री देवी शांतादुर्गा मंदिरासाठी दिला प्रशस्त सभामंडप

देवी शांतदुर्गा मातेच्या आशीर्वादाने आमदार वैभव नाईकच उद्याचे पालकमंत्री;विलास नाईक यांनी घातले देवीकडे साकडे

मालवण : गोळवण गावठणवाडी येथे आमदार वैभव नाईक यांच्या सुमारे ५ लाख रुपये आमदार निधीतून साकारलेल्या येथील श्रीदेवी शांतादुर्गा मंदिराच्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा आमदार वैभव नाईक यांच्या शुभहस्ते काल गोळवण येथे करण्यात आला. येथील भाविक भक्तांची आणि पावसाळ्यात होणाऱ्या उत्सवात होणारी गैरसोय यामुळे दूर होणार आहे. सभामंडपाचे काम पूर्ण झाल्यामुळे येथील भाविक भक्त, ग्रामस्थ, श्री देवी शांतादुर्गा मंदिर ट्रस्टचे सदस्य यांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणालेत गोळवण गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपले नेहमीच सहकार्य लाभले आहे आणि यापुढे सुद्धा गावच्या सर्व विकासात्मक प्रश्नांबाबत आपण नेहमीच पाठीशी राहणार आहोत. येथील रस्त्यांचा प्रश्न,ओहळावरतील पूल,विविध सभा मंडप, वैयक्तिक लाभार्थी योजना असे अनेक प्रश्न पूर्णत्वास गेले असून उर्वरित प्रश्न सुद्धा टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील.यापुढेही आजपर्यंत तुम्ही जसं माझ्यावरती प्रेम केलात तसं प्रेम येणाऱ्या काळातही तुम्ही माझ्यावर करावे अशी विनंती यावेळी केली.

यावेळी बोलताना माजी शाखाप्रमुख विलास नाईक म्हणालेत की या सभामंडपाची अतिशय गरज या ठिकाणी होती आणि आमदार वैभव नाईक यांनी ही गरज ओळखून हे काम पूर्ण करण्यासाठी दिलेला शब्द लगेच पूर्ण करून त्यांनी जी कार्य तत्परता दाखवलेली आहे ही कौतुकास्पद आहे यासाठी येथील ग्रामस्थ येथील ट्रस्ट आणि गावाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. उबाठा शिवसेनेच्या माध्यमातून येथे विकास झालेला असून भविष्यात सुद्धा उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. तसेच श्री देवी शांतादुर्गा मातेच्या कृपेने आमदार वैभव नाईकच उद्याचे पालकमंत्री असतील असे विश्वासाने सांगितले.यावेळी पंचक्रोशीमध्ये पशुवैद्यकीय सेवा देणारे दिगंबर परुळेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज,पराग नार्वेकर,रुपेश वर्दम,माजी शाखाप्रमुख विलास नाईक, उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण,मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद नाईक दिगंबर सावंत,राजू नाडकर्णी,आजा सावंत,प्रकाश नाईक, मयुर नाईक, नंदादीप नाईक,दिगंबर परुळेकर,दिवाकर परुळेकर,प्रमोद नाईक,रविंद्र नाईक,विनायक मालवणकर,बंड्या वाडकर,आनंद चिरमुले,आदिओम लाड, समीर लाड,आदी शिवसैनिक, ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!