कणकवली | मयुर ठाकुर: दसऱ्यानंतर गुरुवारी सकाळी गावचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू रवळनाथाच्या गावच्या रहाटी देवांनी सीमोल्लंघन करत गावच्या चारही बाजूच्या (चतुःसीमांना) भेटी दिल्या. रवळनाथ मंदिर ते पटकीदेवी ढालकाठी बाजारपेठेतून ढोलताशा, फटाक्यांच्या आतषबाजीत देवांचे आगमन झाले. झेंडा चौक येथे नादरूकी देवस्थानं ठिकाणी देवांची ब्रम्हवृंदाच्या हस्ते पूजन व गाऱ्हाणे करून नागरिकांनी देवतरंग तसेच पालखीचे पूजन केले. तदनंतर देव पुन्हा बाजारपेठ मार्गे कणकवली पोलीस स्टेशन समोरील महापुरुष मंदिरातून पुन्हा तेलीआळी हायवे मार्गे गाडादेव कडून नरडवे रोड येथील माऊली देवस्थान येथून पुन्हा मंदिरात गेले. यावे शहरातील नागरिकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली.