1.1 C
New York
Friday, February 13, 2026

Buy now

पाककला स्पर्धेत दर्शना कावले प्रथम…!

बांदा : येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सरस्वती पूजनाच्या निमित्ताने पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत सौ. दर्शना कावले (मुग कटलेट) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेला पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेत द्वितीय क्रमांक सौ. रेश्मा सावंत (मुगागाठी) तृतीय क्रमांक रंजना धुरी (मुगाचे कढण) यांना देण्यात आला. एकूण १४ पालक स्पर्धकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध फुलांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या.

सदर स्पर्धेसाठी सौ. मंगल मयेकर, जान्हवी नाईक, भाग्येश धुरी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी परिक्षकांनी विद्यार्थ्यांना पोषक आहाराबद्दल माहीती दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!