5.4 C
New York
Sunday, March 15, 2026

Buy now

कोकण रेल्‍वे मार्गावरील वाहतूक सुरळीत

बोर्डवे परिसरात रूळावर माती आल्‍याने वाहतूक काही काळ झाली होती ठप्प 

सिंधुदुर्ग : कोकण रेल्‍वे मार्गावर ओरोस ते कणकवली या स्थानक दरम्‍यान बोडर्वे परिसरात सायंकाळी रूळावर माती आल्‍याने कोकण रेल्‍वेची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र रेल्‍वेचे कर्मचारी सतर्क असल्‍याने ही माती बाजूला करून कोकण रेल्‍वेची वाहतूक पूवर्वत करण्यात आली.

या दरम्‍यान सावंतवाडीकडे जाणारी तुतारी एक्‍सप्रेस आणि दिवा एक्‍सप्रेस गाड्या कणकवलीत थांबविण्यात आल्‍या होत्या. सुमारे अर्ध्या तासात रूळावरील माती बाजूला करण्यात आली. त्‍यामुळे रेल्‍वे गाड्यांचा फारसा खोळंबा झाला नाही. बोर्डवे परिसरात रूळावर माती आल्‍याने तेथून जाणारी मालगाडी काही काळ थांबविण्यात आली होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!