21.1 C
New York
Friday, July 4, 2025

Buy now

कलमठ-गावडेवाडी चोरी प्रकरणी संशयिताला चार दिवसांची कोठडी

१५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे तपासात स्पष्ट

कणकवली : कलमठ, गावडेवाडी येथील कॅमलिन फोर्स फॅब्रिकेशन अँड पावडर कोटिंग या कारखान्याचे सीलबंद कुलूप तोडून अज्ञाताने चोरीचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कणकवली पोलिसांनी कलमठ, गावडेवाडी येथील परशुराम आप्पा बांदिवडेकर (३८) याला रविवारी ताब्यात घेऊन चौकशीअंती अटक केली होती. तसेच तपासात संशयिताने १५ हजार ७०० रुपयांच्या मुद्देमाल लंपास केल्याचे समोर आले आहे. सोमवारी संशयित परशुराम बांदिवडेकर याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

फेडरल बँकेचे कर्ज थकीत असल्याने २०१६ मध्ये सीलबंद केलेल्या कॅमलिन फोर्स फॅब्रिकेशन अँड पावडर कोटिंग कारखान्याचे कुलूप तोडून अज्ञाताने चोरीचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी फेडरल बँकचे शाखा अधिकारी नितीन कुमार शिवाजी चौगुले यांच्या तक्रारीवरून अज्ञातावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांना कारखान्यांमध्ये सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती चोरी करताना दिसून आला होता. त्यावरून कणकवलीचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, महेश शेडगे, हवालदार पांडुरंग पांढरे यांनी सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची स्थानिक खबऱ्यामार्फत ओळख पटवून त्याचा शोध सुरू केला.

मात्र, पोलिस आपला शोध घेत आहेत हे समजताच संशयित हा पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले तसेच अटक केले. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!