आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश
आमदार नितेश राणे यांच्या वैभववाडी तालुक्यातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश
वैभववाडी : तालुक्यातील खांबाळे गावातील अमोल अंकुश चव्हाण ग्रामपंचायत सदस्य, सूर्यकांत सुतार, आत्माराम सुतार, श्रीकृष्ण पवार, प्रमोद कदम, मारुती सुतार, सुनील सुतार,अनंत पवार, सुनील मोहिते, चंद्रकांत पवार,प्रकाश पवार,सतीश पवार,रवींद्र पवार,पांडुरंग पवार,यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे खांबाळेतील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.
यावेळी आमदार नितेश राणे, दिलीप राव राणे सिंधुदुर्ग बँक संचालक,आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.