आ. नितेश राणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
देवगड : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आम. नितेश राणे पुरस्कृत व देवगड तालुका भारतीय जनता पार्टी देवगड मंडलाच्या वतीने आयोजित केलेल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धेत देवगड किल्ला येथील स्वप्नील जाधव यांच्या (एम.एच.०७-ए.एच.२४५३) या रिक्षाने प्रथम क्रमांकाचे रोख रुपये २५ हजार व आकर्षक चषक पटकाविला आमदार नितेश राणे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना” देवगड रिक्षा सुंदरी” हा बहुमान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल समोरील पटांगण जामसंडे याठिकाणी ही स्पर्धा संपन्न झाली.या स्पर्धेचे उदघाटन माजी आम. अजित गोगटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्री फळ फोडून करण्यात आले. या प्रसंगी भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, तालुका अध्यक्ष राजेंद्र शेट्ये, महेश नारकर, सरचिटणीस शरद ठुकरूल युवा मोर्चा अमित साटम, जिल्हा चिटणीस संतोष किंजवडेकर, शहर अध्यक्ष योगेश पाटकर, दयानंद पाटील, बँक संचालक प्रकाश बोडस, नरेश डामरी गणपत गावकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर, नगरसेवक नगरसेविका, रिक्षा युनियनचे अनंत उर्फ बाबू वाडेकर, रविंद्र कांदळगावकर , उपस्थित स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या “देवगड रिक्षा सुंदरी “बहुमान देऊन गौरविण्यात आले. या वेळी संतोष किंजवडेकर, संदीप साटम, माजी आम ऍड अजित गोगटे यांनी मार्गदर्शन केले. आम. नितेश राणे यांनी उपस्थित रिक्षा चालक मालक या उपक्रमाचे व रिक्षा व्यावसायिक यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करून विजेत्या व सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक. देऊन गौरविले. मान्यवर माजी आम. अजित गोगटे, भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुका प्रमुख विलास साळसकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या निमित्ताने आम. नितेश राणे यांचा देवगड शिरगाव येथील रिक्षा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या रिक्षा सौंदर्य स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे द्वितीय क्रमांक शिवाजी परकर पडवणे (एम.एच.०७-ए एच.३५९४) रोख रु १५ हजार, व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक उमेश तेली किंजवडे (एम.एच.०७-ए एच.३६२५) रोख रु १० हजार व आकर्षक चषक, उत्तेजनार्थ पारितोषिक अनंत उर्फ बाबू वाडेकर (एम.एच ०७-ए. एच. २५७९) देवगड किल्ला, उत्तेजनार्थ सिद्धार्थ नाडणकर (एम.एच.०७-ए एच ३०८४) यांना रोख रु ५ हजार व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार ऋत्विक धुरी यांनी मानले.