10.5 C
New York
Friday, November 8, 2024

Buy now

बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकसह ३८लाखाचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरी

कोल्हापूर |यश रुकडीकर : आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी बेकायदेशीररीत्या दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील आरोपी चेतक वाळवे हा MH 04FF 9794 या स्विफ्ट गाडीमधून पुढे येऊन बेकायदेशीरपणे गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला मार्गाची माहिती देत आहे. दि.११रोजी रात्रीच्या वेळी तो आंबा घाटकडून कोल्हापूरला MH 07 AJ 3513 हा आयशर टेम्पोमधून अवैधरीत्या गोवा बनावटीची दारू वाहतूक करणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सदर ठिकाणी सापळा रचला असता पांढऱ्या रंगाची स्विफ्ट व आयशर टेम्पो अशी दोन वाहने पोलिसांनी पकडली.त्या गाड्यांमध्ये असणाऱ्या व्यक्तींची नावे १)चेतक भगत वाळवे, रा. वाळवेवाडी, ता.कणकवली,२)तुषार तुकाराम वाळवे, रा.वाळवेवाडी, ता.कणकवली,३)शहाबाज अब्दुल गोरे, रा.मुस्लिमवाडी, जि.सिंधुदुर्ग,४)फारुक दस्तगीर जमादार, रा. नाळे कॉलनी,संभाजीनगर,कोल्हापूर असे असल्याचे समजले.यानंतर टेंपोची झडती घेतली असता त्यात बॉक्सेसमधे गोवा बनावटीची रॉयल ब्ल्यू कंपनीची व्हिस्की दारू असलेल्या ४८ सीलबंद बाटल्या सापडल्या.सदरचा माल हा बेकायदेशीर असल्याची खात्री होताच २४,००,००० रू. किंमतीची गोवा बनावटीची दारू,१०,००,००० आयशर टेम्पो व ४,००,००० रुपये किंमतीची स्विफ्ट गाडी असा एकूण ३८,००,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.त्यांच्याविरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलीस अंमलदार सुरेश पाटील,रामचंद्र कोळी,रुपेश माने,वैभव जाधव,विनोद कांबळे,विनायक चौगुले,अमित सर्जे,संजय पडवळ,कृष्णात पिंगळे,महेश पाटील,गजानन गुरव, हंबिर अतीग्रे यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!