कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली च्या वतीने जिल्ह्यातील १३ रस्त्यांवर वृक्ष लागवट करण्याची निविदा काढण्यात आली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ठेकेदारांकडून खर्च काढण्यासाठी या कोट्यावधीच्या निविदा जाहिर करुन, त्याची मुदत 12 ऑक्टोबर पर्यंत अवधी 4 दिवसाची ठेवण्यात आली आहे. त्यात 2 दिवस सुट्टीचे आहेत, म्हणजेच निविदा मॅनेज करण्याचा हा प्रकार आहे. सार्वजनिक बांधकामने वृक्ष लागवट करण्यापेक्षा वन विभाग, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण यांच्यामार्फत ही निविदा देण्याची गरज होती. मात्र निवडणूकीला पैसा गोळा करण्यासाठीच वृक्ष लागवटीच्या कोटींच्या निविदा असल्याचा आरोप माजी आ. परशुराम उपरकर यांनी केला. तसेच रेल्वे स्टेशनच्या निविदेप्रमाणेच मंत्र्यानी ठेकेदार निश्चित केले असावेत. असा टोला त्यांनी लगावला .
कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात ते बोलत होते, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधकाम विभागामार्फत वऋक्ष लागवटीसाठी निविदा जाहिर करुन त्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक पदे भरण्यात येणार आहेत. ती केव्हा भरली जाणार ? ज्या प्रमाणे पुतळ्याचा टेंडर प्रक्रिया आहे. तसाच गोलमाल दिसत आहे. शेतकरी आहेत ते स्वतः झाडे लावताना जुन मध्ये लावतात. मग ही कोणती पद्धत नोव्हेंबर मध्ये झाडे लावण्याची ? 10 हजार झाडे लावणार असे सर्वगोड यांनी सांगितले होते. त्याचे काय झाले. केवळ निविदा काढल्या जातात. ठेकेदारांचे पैसे न दिल्यामुळे ते आंदोलमन करत आहेत असा टोला श्री. उपरकर यांनी लगावला.