8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

नागरिकांना वर्षानुवर्ष वापरता येईलअसे गार्डन बनवले जाईल:आमदार नितेश राणे

कलमठ येथील श्री देव कलेश्वर मंदिर गार्डनचे आ.नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन

विधानसभेसाठी विरोधात उभा राहणारा उमेदवार मिळत नाही:आ.राणेंचा विरोधकांना टोला

कणकवली | मयुर ठाकूर : आम्ही नारायण राणेंचे कार्यकर्ते आहोत,जेव्हा कलमठ गावासाठी गार्डन देण्याचा शब्द दिला, तेव्हाच हे काम करायचं ठरवले होते.त्यामुळे या गार्डन कामासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.या गार्डनचा चांगला प्लॅन बनवला आहे. येथील नागरिकांना वर्षानुवर्ष हे गार्डन वापरता येईल,असे बनवले जाईल. या गावचे सरपंच, उपसरपंच हे तरुण विचाराचे आहेत. त्यांनी आपले गाव शहरालगत असल्याने पर्यटन दृष्ट्या लोकांना आकर्षित करण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी लागणारा निधी देण्याचं काम तुमचा आमदार म्हणून मी करेन, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले. विधानसभेसाठी विरोधकांना माझ्या विरोधात उभा राहणारा उमेदवार मिळत नाही,असा टोलाही त्यांनी लगावला.

कलमठ येथील श्री देव कलेश्वर मंदिर गार्डन १ कोटींच्या कामाचा आ.नितेश राणेंच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.यावेळी गावचे खोत सुनील नाडकर्णी,भाई खोत,भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, ग्रामीण तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर,कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, गुरू वर्देकर, बबन गुरव, बाबू नारकर, अनंत हजारे, संजू विखाळे, आपा गुरव, साबाजी गुरव, जयराम चिंदरकर, बाळा चिंदरकर, दिनेश गोठणकर,मिलिंद चिंदरकर, बाळा नारकर, प्रभाकर कोरगावकर, बंडू दंताळ ,निलेश महिंद्रेकर, नितीन पवार, श्रेयस चिंदरकर, विनिता बुचडे,नेहा वावळीये ,समर्थ कोरगावकर, अनिल मेस्त्री, महेश मेस्त्री ,गिरीश धुमाळे, परेश कांबळी, प्रथमेश मठकर, अनिल मठकर, अभिजित गुरव,सतीश चिंदरकर, अबा कोरगावाकर, गणेश पुजारे, मंदार चिंदरकर, प्रशांत गोठणकर, गुरु चिंदरकर, भूषण खाजणवडकर, स्वरुप कोरगावकर, तानोज कलसुलकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आ.नितेश राणे म्हणाले,या गावातील ग्रामस्थांनी कलेश्वर मंदिर परिसराचे सुशोभिकरण ,गार्डन करण्याची मागणी केली होती.त्यावेळी मी राणेंच्या विचाराचा सरपंच निवडून दिला तर हे काम करुन देईन,असा शब्द दिला होता.तो शब्द पाळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केल्याने भरघोष निधी उपलब्ध झाला आहे.आपण आमचे नेते खा.नारायण राणेंच्या निवडणुकीत ताकदीने पाठीशी राहिलात.मात्र,एक बूथ मागे आहे, तो सुधारण्याची आपली जबाबदारी आहे.कलमठ गाव आणि खा. नारायण राणे कुटुंबीयांचे एक वेगळं नाते आहे. आमच्यावर जे लोक जीवापाड प्रेम करणारे आहेत,त्यांचे आम्ही काम करणार आहोत. आता मला फक्त तुमचे ४० दिवस द्या,मग विकासाची राहिलेली कामे मार्गी लावली जातील.

भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री म्हणाले,कलेश्वर मंदिर आजूबाजूचा परिसर सुशोभिकरण,गार्डन करण्याची गरज ग्रामस्थांनी आ.नितेश राणेंना सांगितली होती.आ.नितेश राणेंनी मंत्रालयात आपले काम मार्गी लावण्यासाठी मंत्र्यांची भेट घेतली.आ.राणेंची कामाची तळमळ मी बघितली आहे.त्यांचे कलमठ गावाशी जिव्हाळ्याचे नाते आहे. हे गार्डनचं काम आता पूर्ण होईल त्याचबरोबर बऱ्याच वर्षापासून ग्रामस्थांना मंदिरात येण्यासाठी महामार्गावरून यावं लागत होतं, त्याला पर्यायी रस्ता बिडयेवाडी येथून पूल मंजूर झाल्यामुळे सोयीचे होणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली.आता हे सुशोभिकरण काम १ कोटी निधी दिला.भविष्यात या कामाचा लोकार्पण सोहळा होताना आ.नितेश राणे पालकमंत्री म्हणून येतील.

सुनील नाडकर्णी म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे गार्डन आपल्या गावात होत आहे. आ.नितेश राणेंच्या हस्ते या कामाचा शुभारंभ केला आहे.कलमठ गाव आपल्या पाठीशी राहील.पालकमंत्री म्हणून आपण पुन्हा या.
यावेळी कलमठ ग्रामस्थांनी गार्डनसाठी १ कोटी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार नितेश राणे यांचा गावचे खोत सुनील नाडकर्णी यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आभार मानले. तसेच या कामासाठी मेहनत घेतल्याबद्दल सरपंच संदीप मेस्त्री यांच्या सत्कार आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.

*(फोटो 9कलमठफोल्डर):: कलमठ कलेश्वर गार्डनचे भूमिपूजन करताना आमदार नितेश राणे सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदि ग्रामस्थ ( छाया : मयुर ठाकूर )

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!