18.9 C
New York
Wednesday, April 30, 2025

Buy now

कुडाळ महामार्गावर दुचाकी-कार यांच्यात अपघात

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळच्या भंगसाळ नदीच्या पुलावर संध्याकाळी ७ च्या सुमारास दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात दोघे जखमी झाल्याची घटना घडली. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, कुडाळवरून ओरोसच्या दिशेने जाणारी दुचाकी क्रमांक MH07 V 0550 आणि कणकवली दिशेने जाणारी कार क्रमांक MH12 VV 9625 यांच्यात अपघात झाला. सदर कार गोव्यावरून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी कुडाळच्या सर्विस रोडवरून ओरोसच्या दिशेने जाणारे दुचाकीला सदर कारची धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे दुचाकीवर बसलेला दुसरा इसम हे जखमी झाले आहेत. या अपघात घडल्यानंतर कारचा टायर फुटून ती दुभाजकाला आपटली. याबाबत कुडाळ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!