7.6 C
New York
Monday, November 4, 2024

Buy now

विनयभंगप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यासह ४ जणांना जामीन मंजूर

देवगड : देवगड आनंदवाडी उतार परिसरात १८ वर्षे वयाच्या कॉलेज युवतीच्या हाताला पकडून व तिच्याशी अश्लील संभाषण करून दिवसाढवळ्या अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक झालेल्या पोलिस कर्मचारी प्रवीण विलास रानडे, सटवा केशव केंद्रे, माधव सुगराव केंद्रे, शाम बालाजी गिते, शंकर संभाजी गिते यांना सिंधुदुर्ग अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. २४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास देवगड एस.टी. स्टॅण्ड येथून आनंदवाडी उताराच्या ठिकाणी जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा वसई येथून पर्यटक म्हणून आलेला पोलिस कर्मचारी हरीराम मारुती गिते याने मद्यधुंद अवस्थेत हात पकडून गाडीत ओढण्याचा प्रयत्न करत अपहरणाचा प्रयत्न केला होता. तसेच त्यावेळी गाडीत बसलेले हरिराम गिते याचे उर्वरित ५ साथीदार प्रवीण विलास रानडे, सटवा केशव केंद्रे, माधव सुगराव केंद्रे, शाम बालाजी गिते, शंकर संभाजी गिते यांनी त्या युवतीचे अपहरण करण्यासाठी चिथावणी दिली होती. घटनेच्या वेळेस विद्यार्थिनीने आरडाओरडा केल्यामुळे जमा झालेल्या लोकांनी घटनास्थळावरून सर्वांना पकडून बेदम चोप देऊन देवगड पोलिसांच्या हवाली केले होते. देवगड पोलिसांनी संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करून ६ व्यक्तींना अटक केली होती.

अटक झालेल्यांमध्ये वसई येथील २ पोलिस कर्मचारी, हरिराम गिते व प्रवीण विलास रानडे सामील असल्यामुळे आणि उर्वरित संशयितांपैकी एक जण सी.आर.पी.एफ. या निमलष्करी दलात कामाला असल्यामुळे तसेच बाकीचे आरोपी देखील शासकीय सेवेत असल्यामुळे प्रचंड जनप्रक्षोभ उसळला होता. अटकेनंतर संशयित आरोपींनी देवगड पोलिस कर्मचाऱ्यांवरही हल्ला चढवला होता. त्यामुळे देवगड पोलिसांनी वाढीव कलम ७९ व कलम ३२ लावले होते. संशयित आरोपींना देवगड न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी दिली होती.

त्यानंतर संशयितांना सावंतवाडी जिल्हा कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. याकामी आरोपीच्या वकिलांकडून काही डिजिटल पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले होते. आरोपीच्या वकिलांनी तपास कामाची पूर्तता, दबावापोटी झालेली कारवाई, घटनास्थळावरील आरोपींची अनुपस्थिती हे मुद्दे प्रामुख्याने न्यायालयासमोर मांडले होते. न्यायालयाने आरोपींचे मुद्दे ग्राह्य धरत आरोपी क्र. २ ते ६ यांना जामिनावर मुक्त करण्यात आदेश दिले आहेत.

याकामी संशयित पोलिस कर्मचाऱ्याऱ्यांच्यावतीने अॅड. कौस्तुभ मराठे आणि अॅड. उमेश सावंत यांनी यशस्वी युक्तिवाद केला. मुख्य आरोपी हरिराम मारुती गिते याला मात्र अद्याप जामीन मिळालेला नाही.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!