27 C
New York
Thursday, July 31, 2025

Buy now

आरक्षण बचाव रॅली नंतर खारेपाटण विभागातील नडगिवे बौद्धवाडी येथील असंख्य ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

काँग्रेसने आरक्षण संपविण्याची भाषा केली तर मी तुमची ढाल बनून आम्ही उभे राहणार असा शब्द आमदार नितेश राणे यांनी दिला होता

आमदार नितेश राणे यांनी केले भाजप पक्षात स्वागत

कणकवली : येथे झालेल्या आरक्षण बचाव रॅली मध्ये आमदार नितेश राणे यांनी “जय भीम ….. जय निम” चा नारा दिला होता. तसेच आरक्षण आपल्या हक्काच आहे ते कोणाला हिसकवू शकत नाही. त्यामुळे आपल्या संविधानाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही असा शब्द दिला होता. त्यानंतर आज आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होत असंलेली विकास कामे पाहून कणकवली तालुक्यातील नडगिवे बौध्दवाडी येथील ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला.

यावेळी मनोहर पगारे, गणेश जाधव, कीर्तिकांत जाधव, दीपक पगारे, यशवंत पगारे, बाबल्या जाधव, अपूर्वा पगारे, विनय पगारे , तन्मय पगारे, हरेश पगारे, रोहित पगारे, सुनील जाधव, हेमंत जाधव, दिनेश पगारे, यशवंत जाधव, अनंत पगारे, सदाशिव पगारे, यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेऊन पक्ष प्रवेश केला.

यावेळी उपस्थित दिलीप तळेकर, बाळा जठार, सरपंच प्राची इस्वलकर रमाकांत राऊत,सूर्यकांत भालेकर, भाऊ राणे, सुधीर कुबल, राजू वरूनकर उज्वला चिके, अमित मांजरेकर किरण करले, जयदीप देसाई आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!