सिंधुदुर्गनगरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव “मयूरपंख” महोत्सवात उद्यानविद्या महाविद्यालय मोळदेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या महोत्सवात मल्हार महाजन याला “गोल्डन बॉय” व आरोही सावे हिला “गोल्डन गर्ल” हे विशेष पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे सहयोगी अधिष्ठता डॉ. प्रफुल्ल माळी, सांस्कृतिक समन्वयक डाॅ. राजेश राठोड, संघ मार्गदर्शक प्राध्यापक हर्षवर्धन वाघ, डॉ. गिरीश ऊईके, डॉ. विजयकुमार पळसांडे, सुषमा पालक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.