हरियाणातील भाजपच्या विजयानंतर प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी पवार गट मुस्लिम लीग चा बी पार्टनर
श्री गणेश देवतेचा अपमान सहन करणार नाही,दिला इशारा
कणकवली : हरियाणा तो सिर्फ झांकी है .. महाराष्ट्र अभि बाकी है.!असे सांगत हरियाणा राज्यातील भाजपच्या विजयानंतर भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे आनंद व्यक्त केला. हरियाणा मध्ये भाजपा विचाराचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आले आहे.हिंदू विचारांचा मुख्यमंत्री बसणार त्याला जनतेने कौल दिला आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास ठेवला आहे.भाजप एकटा पक्ष विरुद्ध इतर सर्व पक्ष अशी निवडणूक लढून यश मिळवले.मात्र काँग्रेस ला मित्र पक्षांची मदत घेऊन सुद्धा पराभूत झाली आहे अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली. हरियाणाच्या निकाला नंतर संजय राऊत ला हाजमोलाच्या गोळ्या खाव्या लागतील अशी मिस्कील टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
कणकवली येथे पत्रकारांशी आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी ते म्हणाले संजय राऊत पहिल्यांदा मोठ्या बाथा करतो. आणि त्यानंतर पराभव झाला की शेंबड्या मुलासारखा रडतो. हरियाणा प्रमाणेच विकासाच्या अजेंड्यावर तसाच आम्ही महाराष्ट्रात जिंकणार असा विश्वास आहे यावेळी त्यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदूंचे खरे विरोधक मुसलमान नाही तर हिंदू आहेत असे म्हटले होते.आज ते तुतारी राष्ट्रवादी पवार साहेब गटाच्या व्यासपीठावर नेहमी पाहायला मिळते. काही दिवसा पूर्वी ज्ञानेश्वर महारावं नावाच्या कारट्याने हिंदू देवतांचा अपमान केला. काल तुतारीच्या व्यासपीठावरून जानकर नावाच्या कार्ट्याने दीड दिवसाचा गणपती बाप्पा दारू पितो अशा घाणेरड्या शब्दात आमच्या देवतेचा अपमान केला. पवार साहेबांच्या उपस्थितीत केला. पवार साहेब आणि तुतरीचे नेते गुदगुल्या झाल्यासारखे हसत होते. त्यामुळे राष्ट्रवादी पवार गट मुस्लिम लीग चा बी पार्टनर झाला पक्ष आहे. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.हिंदुत्ववादी बोललो तेव्हा नारायण राणे यांच्या चिरंजीवांच्या भाषा पटली नाही आता हिंदू देव देवतांवर घाणेरडी टीका होते तेव्हा ती भाषा तुम्हाला कशी पटते असा सवाल यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला.तुतारी वाल्यांचा हिंदू देवतांची अपमान करणे हाच ह्यांचा हाच मुख्य अजेंडा आहे का हे स्पष्ट कराव.अशी टीका त्यांनी केली. तुतारी च्या व्यासपीठावर सगळे हिंदू असताना देवतांचा अपमान होतो आणि हे खुदू खुदु हसत होते हे सुध्दा या लोकांना शोभणारे नाही असे सुनावले.
महाराष्ट्र राज्यातील निवडणुकी नंतर ह्यांना आपण पाहिलात का? असं संजय राऊत चे फोटो लावून विचारावं लागेल. संजय राऊत ने किती ही ओरड घातली तरी ह्याच्या मालकाला काँग्रेस मुख्यमंत्री पदाचा चेहरा करणार नाही. उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री पदाचा चेहरा न करण्याचं काँग्रेस अगोदर ठरलेलं आहे.त्यामुळे ठाकरे सरकार परत महाराष्ट्रात येणार नाही.घोडा मैदान लांब नाही. उबाठा शिवसेनेत हम दो हमारे दो असच चित्र राहील राहील.