सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेमकं चाललंय काय ?
आ. नितेश राणेंनी देखील साडेसात कोटींमध्ये सहा कोटींचा भ्रष्टाचार केला
दोन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार – शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जि.प.च्या बाहेर धरणे आंदोलन
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत टेंडर मॅनेज करणाऱ्या बाऊन्सर ना शिवसैनिकांनी पकडून चांगला चोप दिला होता. मात्र या प्रकरणी शासनाला जागे करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बाहेर महाविकास आघाडीच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आक्रमक होत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले सावंतवाडी पंचायत समितीची आठ कोटींची निविदा होती ती मॅनेज करण्यासाठी काही ठेकेदार सार्वजनिक बांधकम विभागात एकत्र आले होते. आणि संपूर्ण बांधकाम विभागाला वेठीस धरले होते. सकाळी १० वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत त्या लोकांचा सार्वजनिक बांधकाम विभागात थैयथैयाट सुरू होता. याची दखल घेत आम्ही बांधकाम विभागात जाऊन त्या गोष्टीचा छडा लावला. यावेळी तिथे ठेकेदार आणि भाजपचे लोकप्रतिनिधी होते, शिवसेना आक्रमक होताच भाजपचे नेते पळाले. मात्र त्यांनी नोकरीसाठी जे गरीब बाऊन्सर आणले होते. त्यांना शिवसेनेने आपली ताकद दाखवली. जिल्हापरिषद ही जनतेची आहे. आठ कोटींच्या निविदेते ५० लाखांची सुपारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. यामध्ये सावंतवाडी येथील तालुक्याचा नेता, कणकवली येथील एक पदाधिकारी आणि बांदा येथील शहर प्रमुख धुरी हे यामध्ये आहेत. एवढ्या प्रकारानंतर प्रशासनाची जि जबाबदारी होती ती कोणीही पार पाडलेली नाही. आठ दिवस झाले तरी त्यावर नेमकं काय झालं ? ते बाऊन्सर काय करत होते ? निविदेत पारदर्शकपणा आणला काय ? असे प्रश्न शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी उपस्थित केले.
भाजपचे नेते जे सांगतील त्यांनाच ठेका द्यायचा अशी पद्धत सुरू होती. यामध्ये जिल्हा परिषद बांधकाम मधील अधिकारी देखील सामील आहेत. ज्यावेळी आम्ही पकडून दिलं तेव्हा यांनी सायंकाळी सोडून दिले. त्यांना ज्या लोकांनी येथे आणलं त्यांची चौकशी झाली पाहीजे. शिवसेनेचे शिष्टमंडळ जिल्हा परिषद च्या सीओ न भेटायला गेलो होतो, तेव्ह त्या ठिकाणी बांधकामाचे अधिकरी होते. त्या ठिकणी सांगितले होते की सदर निविदेची मुदत वाढवा जर निविदा ऑनलाइन होती तर ऑफलाईन निविदा देण्यासाठी त्या ठेकेदारांना आपण का बोलावलात ? त्याची चौकशी करा. निविदेची मुदत वाढवा. आणि जिल्हा परिषद मध्ये जो काही प्रकार घडला त्याचं सीसीटीव्ही फुटेज बंद केलं गेलं. ते नेमकं त्याच वेळी का बंद केलं गेलं.त्यामुळे ठेकेदार, भाजपचे पदाधिकारी आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या संगममताने हा भ्रष्टाचार झालेला आहे. महायुतीचे सरकार आल्यांनातर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात धरण, जलजीवन मिशन, सार्वजनिक बांधकाम, नॅशनल हायवे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधीतला पैसा काढायच काम आमदार नितेश राणे यांनी केलं होतं. साडेसात कोटींमध्ये सोलर, व्यायाम शाळा, बेंचेस बसवायचा होत्या. हे सगळे नियम धाब्यावर बसवून साडेसात कोटींमध्ये ६ कोटींचा भ्रष्टाचार आमदार नितेश राणे यांनी केलेला आहे.
मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, महापुरुषांची विटंबना होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधीतले पैसे खाल्ले जात आहेत. नेमकं या जिल्ह्यात चाललंय काय ? अधिकारी भ्रष्ट झालेत. हा विषय जनतेला कळला पाहिजे. शिवसेना आणि महाविकास आघाडीचा हा बुलंद आवाज आहे. जे जे अधिकारी, राजकिय पदाधिकारी, आणि ठेकेदार या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी श्री. पारकर यांनी केली.
त्यांनी आयुष्यभर जनतेला फसवलं ; त्यांच्याकडून सत्तेची अपेक्षा नाही
आ. वैभव नाईक यांच्या जिल्हा परिषद मध्ये झालेल्या राड्यावरून आरोप केले गेले. मात्र आमदार वैभव नाईक यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. ज्यांनी आयुष्य भर जनतेला फसवलं त्यांच्याकडून सत्तेची अपेक्षा नाही. जिल्ह्यात सर्वच कमांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. येत्या दोन महिन्यात शिवसेना आणि महाविकास आघाडीचे सरकार या महाराष्ट्रात येणार आहे. यावेळी त्या भ्रष्टाचारात जे जे अधिकारी आहेत त्या अधिकऱ्यांना सोडणार नाही. त्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हा आणि त्यांची ईडी मार्फत चौकशी करून गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणार असल्याचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, संजय पडते यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.