13 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक पदी हेमचंद्र खोपडे रुजू

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक पदी हेमचंद्र खोपडे हे गुरुवारी रुजू झाले आहेत. हेमचंद्र खोपडे हे यापूर्वी पुणे येथे कार्यरत होते. त्यांनी गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांनी यापूर्वी पूना शहर व पूना ग्रामीण या ठिकाणी काम केले होते. ते मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागामध्येही बदल्यांचे प्रमाण सुरू असून, सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक पदी हेमचंद्र खोपडे हे रुजू झाले आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक म्हणून यापूर्वी अविनाश भोसले हे कार्यरत होते. त्यांची बदली वेंगुर्ला येथे झाल्यानंतर या पदाचा कार्यभार सचिन हुंदळेकर यांच्याकडे होता. हेमचंद्र खोपडे हे मूळ कोल्हापूर मधील असून, त्यांनी यापूर्वी रायगड, पुणे शहर तसेच पुणे ग्रामीण मध्ये विविध पोलीस स्थानकांमध्ये आपले कर्तव्य बनवले आहे. आता त्यांची सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!